Wockhardt , Lupin

Thursday, February 28, 2013

विसरलो

तुम्ही विसरलात तरी मी आठवण करीत राहीन



विसरलो


हुशारी मिळवताना शहाणपणविसरलोI
समजत नाही,मी घडलो की बिघडलो?II
सुख शोधताना जीवनाचा बोध विसरलोI
सुखासाठी साधने वापरताना साधना विसरलोII

भौतिक वस्तूच्या सुखात नैतिकता विसरलोI
धन जमा करताना समाधान विसरलोII
तंत्रज्ञान शोधताना ते वापरण्याचे भान विसरलोI
परिक्षार्थी शिक्षणात, हाताचे कौशल्य विसरलोII

टी.व्ही. आल्यापासून बोलणं विसरलो
जाहिरातीच्या मार्‍यामुळे चांगलं निवडणं विसरलोII
गाडी आल्यापासून चालणं विसरलोI
मोबाईल आल्यापासून भेटीगाठी विसरलोII

कॅलक्युलेटर आल्यापासून बेरीज विसरलोI
संगणकाच्या वापराने विचार करणं विसरलोII

संकरीत खाण्यामुळे पदार्थांची चव विसरलोI
फास्टफूडच्या जमान्यात तृप्तीचीढेकर विसरलोII
ए.सी. मध्ये बसून झाडाचा गारवा विसरलोI
परफ्युमच्या वापरामुळे फुलांचा सुगंध विसरलोII

चातुर्य मिळवताना चरित्र विसरलोI
जगाच्या भूगोलात गावाचा इतिहास विसरलोII

बटबटीत प्रदर्शनात सौंदर्याचेदर्शन विसरलोI
रिमिक्सच्या गोंगाटात सुगमसंगीत विसरलोII
मृगजळामागे धावताना कर्तव्यातला आनंद विसरलोI
स्वतःमध्ये मग्न राहून दुसर्‍याचा विचार विसरलोII

सतत धावताना क्षणभर थांबणं विसरलोI
जागेपणी सुख मिळवताना सुखानं झोपणं विसरलोII


Thanks ,

HR Department





No comments:

Post a Comment